अबब ! 8 वर्षांच्या मुलाची उंची चक्क साडे सहा फुट

अमिताभ बच्चन पेक्षाही उंच आहे हा मुलगा

0 222

मेरठ: आठ वर्षांचे असताना तुमची उंची किती होती असे जर तुम्हाला कोणी विचारले तर तुमचे उत्तर असेल तीन फूट, साडेतीन फूट. पण या ८ वर्षांच्या मुलाची उंची ऐकून तुम्ही नक्की चाट पडाल. करण सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील असणार्‍या मुलाची ही उंची ६ फूट ६ इंच इतकी आहे. केवळ आठ वर्षांचा म्हणजे तिसरीत असणारा हा मुलगा चक्क सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याहूनही उंच आहे. कारण अमिताभ बच्चन यांची उंची आहे ६ फूट २ इंच.

करण त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा जवळपास दुपटीने उंच आहे. त्यामुळे मेरठमध्ये राहणारा हा मुलगा मोठय़ा चर्चेचा विषय आहे. करण आपल्या कुटुंबाबरोबर डिफेन्स कॉलनीत राहतो. आपल्या जन्मापासूनच तो त्याच्या उंचीसाठी रेकॉर्ड बनवत आला आहे. जन्माच्या वेळी त्याचे वजन ७.८ किलो होते तर उंची ६३ सेंटीमीटर होती. या मुलाच्या नावावर जगातील सर्वात उंच मुलगा असल्याचे गिनिज बुकमध्ये रेकॉर्ड आहे.

उंचीच्या बाबतीत त्याच्या आई-वडिलांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ही उंची त्यांच्या कुटुंबाला निसर्गदत्त मिळाली आहे. करणची आई श्‍वेतलाना याही उंचीच्या बाबतीत रेकॉर्डहोल्डर आहेत. त्यांची उंची ७ फूट २ इंच आहे. भारतातील सर्वात उंच महिला म्हणून त्यांची ओळख आहे. त्या बास्केटबॉलच्या खेळाडू असून त्यांनी आतापयर्ंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. करणचे वडील संजय सिंह यांची उंची ६ फूट ७ इंच इतकी आहे.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...