डॉ. लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून डोंगरगाव ते कोसारा पांदण रस्ता पूर्ण 

0

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून झरी तालुक्यातील डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी 22 जून रोजी सदर रस्त्याचे लोकार्पण डॉ. लोढा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी गावातील पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व मोठया संख्येने गावकरी, महिला, शाळकरी मुले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

  

 अगदी काही दिवसांअगोदार म्हणजे 18 जून रोजी डोंगरगाव येथील काही युवक डॉ. लोढा भेटले. त्यांनी गावातील  

समस्या डॉ. लोढांपुढे मांडल्या. ज्यामध्ये डोंगरगाव कोसारा या रस्त्याचे काम करून द्यावे ही मागणी घातली. डॉ. लोढा यांनी गावकऱ्यांची मागणी त्वरीत मान्य केली व दुसऱ्याच दिवशी कामास सुरवात केली.  कामास सुरवात केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेला कोसारा पांदण रस्ताही बनवून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. तेव्हा मागणीला मान्यता देत केवळ 48 तासांत कोसारा येथील शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता व डोंगरगाव कोसारा हा विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता असे दोन पांदण रस्ते बांधून पूर्ण करण्यात आले. या पांदण रस्त्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सोयीस्कर झाले आहे.

 

पावसाळ्यात कोसारा रस्ता पूर्णपणे बंद राहत होता. ज्यामुळे डोंगरगाव येथील शाळकरी मुलांना शाळेत जाणे कठीण झाले होते. यावेळी लोढा यांच्या सहकार्याने व गावातील लोकांच्या लोकसहभागातून दोन्ही रस्ते बांधून पूर्ण करण्यात आले.  

 

 डॉ. लोढा यांच्या आगमनाने गावात जल्लोष साजरा करण्यात आला. डोंगरगाव येथील हनुमान मंदिरात डॉ. लोढा यांच्या स्वागत व सत्कार कार्यक्रम घेण्यात आले. ज्यांचे जीवन या रस्त्याने घडणार आहे अशा चिमुकल्यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. लोढा उपस्थित होते. शिवाय स्वप्निल धुर्वे, मत्ते, राजू उपरकर, सिराज सिद्धीकी, संजू दंडे गावातील पोलीस पाटील एन बी कांबळे, माजी पोलीस पाटील शंकर माहुरे, नीलकंठ बोरकर, गोपीचंद निखाडे व कार्यकते उपस्थित होते.

  

 काय म्हणाले सत्कारमूर्ती डॉ लोढा  

डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्ता हे दोन्ही रस्ते म्हणजे गावातील लोकांची मेहनत आहे. हे रस्ते बनल्याने गावातील माझ्या शेतकरी बांधवांना शेती करणे अधिक सोयीस्कर झाले. मला शासन प्रशासनावर ताशेरे ओढायचे नाही का त्यांनी या महत्वपूर्ण कामाकडे दुलक्ष केले हेही मला माहित नाही. परंतु हा रस्ता बनल्याने गावकर्यांना जो आनंद झाला त्यांचाआनंद पाहून मलाही आनंद होत आहे. ज्यावेळी मी वणीत आलो त्यावेळी मला येथील परिस्थितीची जाण झाली. त्याचवेळी ठरविले की आपल्याला काहीतरी सुधारणा घडवून आणावयाच्या आहे तेव्हापासून मी सामाजिक कार्यास सुरवात केली. हळूहळू काम वाढत गेले व मला समाधान मिळत गेले. राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी केले पाहिजे. परंतु या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. म्हणून मी माझ्या समाजकारणाला आता राजकारणाची जोड देत असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.