भीम ऍप वापरणा-यांना आनंंदाची बातमी, मिळणार कॅशबॅक

15 ऑगस्टपासून मिळणार ग्राहकांना लाभ

0

नवी दिल्ली: भीम ऍप हे कॅशलेससाठी वापरलं जाणा-या ऍप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्वातंत्रदिनानिमात्त भीम ऍपनं युजर्ससाठी एक धमाकेदार प्रस्ताव आणला आहे. जर तुम्ही भीम हे ऍप १५ ऑगस्ट पासून दिनापासून वापरल्यास तुम्हाला घसघशीत कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) चे व्यवस्थापकीय संचालक सीईओ एपी होटा यांनी ही माहिती दिलीये.

एनपीसीआईने गेल्या वर्षीच्या अखेरीस भीम ऍप सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर रोख चलनातील व्यवहार कमी व्हावेत आणि लोकांनी डिजिटल व्यवहार सुरू करावेत, यासाठी डिसेंबरमध्ये या अ‍ॅपची घोषणा करण्यात आली होती. या अ‍ॅपचा वापर करणा-यांना सध्या १0 ते २५ रुपये इतका कॅशबॅक मिळतो. पण अन्य अ‍ॅप त्याहून अधिक कॅशबॅक देतात. त्यामुळे भीमच्या कॅशबॅकमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास १५ ऑगस्टपूर्वीच संमती मिळण्याची शक्यता आहे.

पेटीएम व फोन पे हे दोन पेमेंट अ‍ॅप खूप कॅशबॅक देतात. त्याहून अधिक कॅशबॅक दिल्यास लोक भीमकडे वळतील, असे सांगण्यात येते. भीम अ‍ॅप डाऊनलोड केलेल्यांची संख्या दीड कोटीच्या वर आहे. मात्र त्यापैकी ४0 लाख लोकच पेमेंटसाठी त्याचा प्रत्यक्ष वापर करतात. आता या कॅशबॅक ऑफरमुळे किती लोक भीम ऍपकडे वळणार हे लवकर दिसून येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.