शिरपूर-शिंदोला रस्त्यावर जीवघेणा खड्डा

खड्ड्यामुळे बळावली अपघाताची शक्यता

0

प्रतिनिधी, शिंदोला: वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला रस्त्यावर पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र तरी देखील साबांवि याकडे दुर्लक्ष करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर खड्ड्यात पाणी भरून असल्यानं वाहन चालकांना रस्ता आहे की, खड्डा हे लक्षात येत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हा खड्डा बुजवून रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी विठ्ठल बोंडे, संदीप थेरे, अरुण ताजणे इत्यादींनी केली आहे.

(वकिलाची महिला वाहतूक शिपायाशी अरेरावी, गुन्हा दाखल)

Leave A Reply

Your email address will not be published.