Yearly Archives

2020

आजपासून मुकुटबन येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू

सुशील ओझा, झरी:-- तालुक्यातील मुकुटबन येथे १९ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली होती. परंतु झरी तालुक्यातील मुकुटबन येथील केंद्राला…

रोटे. अनिल उत्तरवार यांना मातृशोक

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील सुरेखा गजाननराव उत्तरवार (65) यांचे बुधवार 18 नोव्हें. रोजी निधन झाले. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचे उपचार सुरू होते. बुधवारी नागपूर येथील घाटरोड…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक

सुशील ओझा, झरी: मंगळवारी 17 नोव्हेंबरला मुकुटबन येथील एका देशी दारूच्या दुकानातून दोन तरुण दारूच्या बाटल्या घेऊन चंद्रपूर जिल्यातील कोरपना तालुक्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार धर्मा सोनुने, जमादार अशोक…

रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई 

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील हिवरा मजरा शिवारात रेतीतस्करी होत असल्याची गुप्त माहिती मारेगाव पोलीस व महसूल विभागाला मिळाली. परफेक्ट सापळा रचून रेतीतस्करी करणारे 4 रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करून 12 आरोपींना मारेगाव पोलिसांनी अटक केली.…

आज जैताई मंदिरात सुयोग बुरडकर यांचा अभिनंदन सोहळा

जब्बार चीनी, वणी: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुयोग सुधाकर बुरडकर या युवकाला नुकताच झी युवा पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळवणारा हा वणीतील प्रथम युवक ठरतो. त्यानिमित्त श्री जैताई मंदिर वणी येथे दि.१८…

‘ट्रू स्माईल’ ने आणलं त्यांच्या चेहऱ्यांवर हसू

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळीच्या पर्वावर ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्थेने मेळघाटातील ‘सलोना’ गावात आदर्श उपक्रम घेतला. येथील आदिवासी, विधवा महिला, वृद्ध, गरजू तसेच अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू दिल्यात. दिवाळीला या…

जाहीर सूचना: मालमत्तेच्या जाहीर लिलावात सहभागी न होण्याबाबत

जाहीर सूचना मौजा. वणी येथील नगर पालिका हद्दीतील कोंडवाड्या जवळील गणेशपूर रोड स्थित ब्लॉक/शॉप क्रमांक 1, गोविंद कॉम्प्लेक्स, शिट नं 19 बी प्लॉट नं 255 आराजी 18.03 चौमी (194 चौ,फूट) ही मालमत्ता तसेच त्याच मिळकतीतील जिन्याच्या खालची आराजी…

दिवाळी अंकाची महाराष्ट्रीय परंपरा ‘शब्दोत्सव’ने पुढे चालवावी – दिलीप एडतकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळी अंकांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. नव्या पिढीने ही परंपरा जपली. प्रीती बनारसे रेवणे ही नव्या पिढीतली संपादक धाडसाने दिवाळी अंक काढते, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाने…

दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांचा कापसावर डल्ला

नागेश रायपुरे, मारेगाव: दिवाळीच्या धामधुमीत सारेच असताना तालुक्यातील पेंढरी येथील एका शेतक-याच्या घरातुन चोरट्यानी चक्क दिवाळीच्या दिवशी डाव साधत कापूस चोरून नेला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अद्याप एक आरोपी…

धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाणीपुरवठा केल्याचा धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार बोपापूर येथे उघडकीस आला आहे. सोमवारी 16 नोव्हेंबरला ही घटना समोर आली. याबाबत ग्रामपंचायतीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.…