आज जैताई मंदिरात सुयोग बुरडकर यांचा अभिनंदन सोहळा

मराठी विज्ञान परिषद व प्रेस वेलफेअर असोसिएशनचा उपक्रम

0

जब्बार चीनी, वणी: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुयोग सुधाकर बुरडकर या युवकाला नुकताच झी युवा पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळवणारा हा वणीतील प्रथम युवक ठरतो. त्यानिमित्त श्री जैताई मंदिर वणी येथे दि.१८ नोव्हेंबर २०२०रोजी दुपारी ४:३० वाजता सुयोग यांचा अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद व प्रेस वेलफेअर असोसिएशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होत आहे.

वणीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमीतून सुयोगने कार्य सुरू केले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात स्वकर्तुत्वाने मोठी भरारी घेतली. उद्योग क्षेत्रात त्याने घेतलेली उंच “गरुडभरारी” निश्चितच अनेक युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

तरी सर्वांनी या अभिनंदन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषद वणीचे अध्यक्ष प्रा. महादेवराव खाडे विभाग, प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

हेदेखील वाचा

‘ट्रू स्माईल’ ने आणलं त्यांच्या चेहऱ्यांवर हसू

Leave A Reply

Your email address will not be published.