Yearly Archives

2020

‘वणी, मारेगाव झरी तालुक्यात ओला दु्ष्काळ जाहीर करा’

विवेक तोटेवार, वणी: परतीच्या पावसाने परिसरातील शेतक-यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस साठी प्रति एकर सरासरी 25 हजार रुपये शासनाने मदत द्यावी अशी मागणी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार…

शिरपूर शेत शिवारातील कपाशीवर बोंडअळीचा हल्ला

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथे कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शिरपूर परिसरातील शिरपूर, सुरजापूर, निपाणी-पिंपरी या शेत शिवारात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची…

दीपक चौपाटी येथे राडा: दोन इसम जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन इसमांमध्ये भांडण झाले. या भांडणात एक इसमाने दुसऱ्यावर धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती हा सेवानगर परिसरातील…

भांडे घासत असताना झगडा करणे महिलेला भोवले….

सुशील ओझा, झरी: मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के. जी. मेंढे यांनी आरोपी ताराबाई मदन अग्रवाल (55) रा. अडेगाव या महिलेला एक वर्षाच्या कालावधीत सदवर्तन ठेवावे व याच कालावधीत शांततामय जीवन व्यतीत करावे अशी शिक्षा…

कोरोनाचा पुन्हा कहर सुरू… आज 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये आर-टीपीसीआर टेस्टनुसार 6 तर रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार 8 पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी कुरई येथे 7 रुग्ण, सुंदर नगर येथे…

अनुदानीत हरभरा बियाणे वाटपाचे आदेश धडकले

विलास ताजने, वणी:  चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी अनुदानीत हरभरा बियाणे प्राप्त झाले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानीत हरभरा बियाण्यांपासून वंचित होते. त्यामुळे वणीबहुगुणी न्युज पोर्टलवर 'एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला…

रावण दहनावर बंदी आणा, निवेदन सादर

विवेक तोटेवार, वणी: रावण हा आदिवासी समाजाचे आद्य दैवत असल्याने दस-याला रावणाचे होणारे दहन रोखण्यात यावे, अशी मागणी आदिवासी संघटनांतर्फे करण्यात आली. याबाबत मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी…

आवास योजनेच्या अनुदानासाठी उपोषण सुरू

सुशील ओझा, झरी: घरकुल योजनेचे हप्ते अद्याप न मिळाल्याने झरी येथील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. कालिदास अरके, गजानन मडावी,राजू शेख व पिंटू सोळंकी यांनी स्थानिक बस स्टँड चौकात उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायत…

तहसिलदार यांच्या आदेशाची ठाणेदारांकडून पायमल्ली ?

सुशील ओझा, झरी: सुरदापूर येथील रेती चोरी प्रकरणी तक्रार दाखल होऊनही अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाची ठाणेदार पायमल्ली तर करीत नाही असा आरोप होत आहे. या प्रकरणी तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र…

मारेगाव नगर पंचायतीवर भाकपचा हल्लाबोल

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नगर पंचायत कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, एमआयडीसी सुरू करावी, अतिक्रमीत लोकांना कायम स्वरूपी…