कायरच्या प्रयास इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुनीता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक शिवशंकर नांदे, अतुल पंधरे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला चंद्रशेखर मत्ते, गुणरत्न आवारी, दीपक कोवे, बळवंत जुमनाके, शंकर घुगरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावरील पाहुण्यांनी आणि विध्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. विध्यार्थ्यांनी गीते सादर केली.

प्रास्ताविक कल्याणी गाऊत्रे तर संचालन सपना बेसरकर यांनी केले. आभार टीना मुळेवार यांनी मानले. मानवी ठावरी या विध्यार्थीनीने साकारलेल्या सावित्रीबाईच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.