महिला चक्कर येऊन पडल्यानं त्या ठिकाणी काही लोक गोळा झाले. त्यातील तहसिल कार्यालयातील नंदकुमार बुटे, प्रशांत गोहणे, वाहन चालक साईनाथ झाडे यांनी तिला तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शासकीय वाहनानं उपचारासाठी दाखल केले. काजलवर ग्रामीण रुग्णालयातील डॉ माधुरी कांबळे, परिचारिका ठाकरे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी उपचार केले.
(Exclusive: मार्डी येथे बंद झालेल्या दारू दुकानातून दारूची सर्रास दारूविक्री )
सदर विवाहितेनं विषारी द्रव्य का पिलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र कालच ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे पतीचा त्रास हे कारण आहे की आणखी दुसरं कारण याचा पोलीस तपास करीत आहे. सध्या काजलची प्रकृती स्थिर आहे.