आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा माझेच कार्य सुरू: संत डॉ. रामराव महाराज

आरोग्यधाम हॉस्पिटलचा पहिला वर्धापनदिन थाटात पार

0

दिग्रस (प्रतिनिधि): आरोग्यधाम हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवूत आहे. माझ्या नावाने चाललेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा दिली जाते याचा मला आनंद आहे. समाजसेवेचे जे व्रत मी अंगिकारले तेच कार्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आरोग्यधाम हॉस्पिटलची चमू करीत आहे. असे प्रतिपादन पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांनी केले. दिनांक 7 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता दिग्रस येथे स्थानिक संत डॉ. रामराव महाराज आरोग्य हॉस्पिटलचा पहिला वर्धापण दिन धडाक्यात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते महात्मा फुले जन आरोग्य कक्षाची फीत कापून या योजनेचा शुभारंभही करण्यात आला.

पुढे बोलताना संत डॉ. रामराव महाराज म्हणाले की आज बंजारा समाज प्रगतीपथावर जाण्याचा प्रयत्न करीत असला, तरी समाजातील अऩेक घटक आजही मागास आहे. समाजात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे. समाजातील अनेक व्यक्ती आजही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक इत्यादी क्षेत्रात कार्य करीत आहे. यात वैद्यकीय क्षेत्र थोडे दुर्लक्षीत राहिले होते. मात्र एकही रुग्ण केवळ पैसे किंवा साधनांची कमी असल्याने वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्यधाम हॉस्पिटलची चमू जे कार्य करीत आहेत ते वाखाण्याजोगे आहे, असे ही ते म्हणाले.

7 मे रोजी डॉ. संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दस्तुरखुद्द संत डॉ. रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी दुपारीच डॉ. रामराव महाराज त्यांच्या दोन सहका-यांसह दिग्रसमध्ये पोहोचले. सुरूवातीला त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तसेच रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य कक्षाचे त्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या योजनेद्वारा केसरी आणि पिवळे राशनकार्ड धाकरांना 971 प्रकारच्या आजार तसेच 121 पाठपुरावा सेवा यावर शासकीय योजनेद्वारा मोफत उपचार केला जाणार आहे. यात महागड्या शस्त्रक्रिया व मोफत औषधीचाही समावेश आहे.

संध्याकाळी 7 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. या डॉ. रामराम महाराज यांच्यासह डॉ सुधाकर आसेगावकर, डॉ गणेश राठोड (अकोला), डॉ बानोत (तालुका वैद्यकीय अधिकारी) दिग्रस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. मान्यवरांचे यावेळी हार घालून तसेच शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अल्फा रोकडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केले.

प्रास्ताविक करताना डॉ. श्याम जाधव म्हणाले की…

चार डॉक्टरांनी एकत्र येत स्वतःचे क्लिनिक बंद करून एक मोठे हॉस्पिटल उभे करणे हे एक आव्हान होते. मात्र अनेक अडचणींवर मात करून हे आव्हान आम्ही सर्वांनी पेलवले व आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाले. संत सेवालाल महाराजांनी सामान्यातल्या सामान्य घटकाचा विचार केला आहे. त्यामुळे आमचीदेखील ही नैतिक जबाबदारी ठरते. त्यामुळे महात्मा फुले आरोग्यदायी योजनेद्वारे रुग्णांवर शासकीय योजनेतून मोफत उपचार केले जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ वंदनीय डॉ. रामराव महाराजांच्या हस्ते झाला, हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. असेही डॉ. श्याम जाधव म्हणाले.

प्रास्ताविकेनंतर डॉक्टर असोसिएशनचे डॉ सुधाकर आसेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत हॉस्पिटलच्या चमुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संत डॉ. रामराव महाराज यांचा आरोग्यधाम हॉस्पिटलच्या चमुच्या वतीने  सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  मंचावर डॉ. चंद्रशेखर भोंगाडे, डॉ. सचिन अग्रवाल, डॉ. प्रकाश खडसे, डॉ. मुलचंद गड्डा, डॉ. अशोक नालमवार, आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. संदीप दुधे यांच्यासह मानोरा आणि आर्णी येथील ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अल्फा रोकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. श्याम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर्स असोसिएशन दिग्रस, संत डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलच्या चमुनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.