अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड

तरुणावर विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका अल्पवीन आदिवासी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 च्या मध्यरात्री एका तरुणाने सदर मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त माहिती नुसार आरोपी शेख जाहिद शेख करीम वय १९ वर्ष हा मुकुटबन येथील रहिवाशी आहे. १५ मे च्या रात्री ३.३० वाजता दरम्यान गावातीलच एका आदिवासी समाजाच्या मुलीच्या घरासमोर उभा होता. मुलगी बाथरूमला जाण्याकरिता करिता घराच्या बाहेर निघाली असता घरासमोर आरोपी शेख जाहिद शेख करीम तिथे उभा होता. त्याने मुलीच्या नावाने आवाज देऊन हाक मारली. सदर प्रकराने मुलगी घाबरली व तिने आपल्या वडीलाला बोलाविले. वडील येताच आरोपीने तिथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी मुलीचे आई वडील व मुलगी यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली. आरोपी अऩेक दिवसांपासून वाईट उद्देश ठेऊन असून त्याने अनेकदा पाठलाग केला. तसेच पाठिमागून येऊन स्पर्श केला. घटनेच्या दिवशीही तो विनयभंग करण्याच्या उद्देशाने घरासमोर आला होता अशी तक्रार मुलीद्वारे करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार धर्मा सोनुने करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.