विलास ताजने, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर) यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय टिचर इनोव्हेशन अवार्ड नुकताच जाहीर झाला आहे. यासाठी राज्यातील १०५ शिक्षकांची निवड झाली असून यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा परमडोहचे शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे, महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुडाणाचे गजानन शिवाजी गोपेवाड, कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुकळीचे संदीप मधुकरराव कोल्हे यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांना देण्यात येतो.
यात नीलेश सपाटे यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र भाषा ( मराठी, हिंदी, इंग्रजी ), शीर्षक – ‘अक्षरधारा’ होते, गजानन गोपेवाड यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ), शीर्षक – ‘कृतीयुक्त विज्ञान व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे’, तर संदीप कोल्हे यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र भाषा ( मराठी, हिंदी, इंग्रजी ), शीर्षक – ‘ अन मुलं कवी झाले ‘ होते.
सदर पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरीय इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इन स्कूल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. एज्युकेशन इनोव्हेशन बँक प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थी गुणवत्तासाठी नाविन्यपूर्ण प्रयोगाचे प्रेरक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, मारोती सोयाम, केंद्रप्रमुख लक्ष्मण इद्दे, शहाजी घुले यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.