सावधान वणीकर ! पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटणारी टोळी सक्रीय

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकविले

0
वणी: वणीत पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध लोकांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. रविवारी दुपारी संजय पेचे यांची आई धनोजे कुणबी सामाजिक भवनात कार्यक्रमात जात असताना एका भामट्यानं त्यांच्या अंगावरील दागिणे लुटले. हा भामटा दुचाकीनं आला होता. त्यानं पोलीस असल्याची बतावणी केली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कॉलनीतील एका सेवानिवृत्त शिक्षकाला पोलीस असल्याची बतावणी करत फसवण्यात आलं होतं. ते वृध्ध साई मंदिर परिसरातून बँकेच्या लॉकरमध्ये दागिणे ठेवण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्याजवळील लाखो रुपयांची थैली हिसकावून भामट्यांनी पळ काढला.
या घटनेला आठवडा उलटत नाही तोच रविवारी पुन्हा एक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसंच पोलिसांनी अशा भामट्यांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.
Leave A Reply

Your email address will not be published.