महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

संध्याकाळी घरून निघाल्यानंतर सळाळी आढळले प्रेत

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथील एका ३७ वर्षीय महिलेचा आज गुरूवारी सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सालेभट्टी ते मांगरुळ रोडलगत हा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत परिसरात घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

जंगलाबाई उर्फ पुष्पा मारोती मेश्राम, वय ३७ ही महिला सालेभट्टी येथील रहिवाशी आहे. काल बुधवारी संध्याकाळी ती घरून निघाली होती. तेव्हापासून तिचा पत्ता नव्हता. आज गुरूवारी परिसरातील नागरिकांना मांगरुळ रस्त्याने जात असताना या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. त्यांनी लगेच याची माहिती तिच्या पतीला दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृतक महिलेचे पती मारोती भिमा मेश्राम यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली असुन, मारेगाव पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला आहे. ही घटना घातपाताची असल्याची चर्चा परिसरात आहे. सदर महिलेचे शव विच्छेदनासाठी पाठविले असून त्यानंतर आत्महत्या की घातपात याचे गुढ उकलले जाणार आहे. या घटनेचा तपास पो. नि. दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमोल चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.