राजुरा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चंद्रपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
सुदर्शन निमकर यांना आघाडीतर्फे जागा देण्याची मागणी
राजुरा: बुधवारी दिनांक 24 जुलै रोजी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विधानसभा निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवार मा. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. या वेळी राजुरा विधानसभा क्षेत्राची जागा रा. काँ.च्या कोट्यात घेऊन सुदर्शन निमकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे. बुधवारी दुपारी चार वाजता चंद्रपूर येथे जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश रा.काँ.च्या वतीने नियुक्त कमिटीचे निरीक्षक माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार तथा प्रदेश चिटणीस दिनानाथजी पडोले, प्रदेश चिटणीस गवाल वंशी, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार हे या कमिटीत होते.
दरम्यान राजुरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कमिटीसमोर सुदर्शन निमकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. कमिटीने कार्यकर्यांच्या भावना ऐकून तसा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजुरा विधानसभा अध्यक्ष नीलेश ताजने, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष महेमुद मुसा,राजुरा तालुका अध्यक्ष हरिदास झाडे,गोंडपिपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, कोरपणा तालुका अध्यक्ष अरुण डोहे,जिवती तालुका अध्यक्ष कैलास राठोड, राजुरा शहर अध्यक्ष विठ्ठल येवले, राजुरा युवक तालुका अध्यक्ष नवनाथ पिंगे,राजुरा शहर युवक अध्यक्ष नितिन बांब्रटकर, किसान सेलचे राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, संजय पावडे, बाळनाथ वडस्कर,आदित्य भाके, प्रमोद कुंभरे,सुधाकर चौधरी, किसन मुसळे, काशिनाथ गोरे,धोंडु बोढे, सुरेश कौरासे, पिंटू चोथले, मारोती मोरे, विजय साळवे, रामदास वडस्कर, गोविई मिटपल्ले, हावगी शेख,बाबु उईके, शरद जोगी, अमोल आसेकर, सरपंच प्रदिप कुळमेथे,फरकडे, पंकज विरुटकर,धनंजय विरुटकर, संजय वडस्कर, श्याम चौधरी, भसारकर, सहदेव कुंभरे, वडपल्लीवार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.