कारंजा: गुरूवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धनज (बु) येथे सकाळी 10 ते 2 दरम्यान महाआरोग्य शिबिर होणार आहे. संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे महाआरोग्य शिबिर होत आहे. यात विविध आजारांवर रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत होणा-या या शिबिरात पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहे. यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाणार आहे.
आपल्या भागात मोठ्या प्रमाणात गरीबी आणि दारिद्र्य आहे. पैशाअभावी अनेक गंभीर आजारावर रुग्णांना योग्य तो उपचार मिळत नाही. मात्र “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरू झाल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये यासाठी या योजनेची माहिती अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवावी. – डॉ. श्याम जाधव (नाईक)
या आरोग्य शिबिराला परिसरातील गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील, डॉ अभय पाटील, डॉ. कल्पना जाधव यांनी केले आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास किंवा अडचण आल्यास ९४२२९२२८६३, ९०२१०१४५१८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.