सुशील ओझा, झरी: तालुक्यातील इयत्ता पहिली ते ८ पर्यंतच्या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीव कार्यक्रम अंतर्गत अध्ययन निष्पत्ती उद्बोधन वर्ग जि.प शाळा मुकूटबन येथे घेण्यात आला. या वर्गात मुकूटबन ,बोपापुर केंद्रातील सर्व शिक्षक हजर होते. बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अध्यापन करणे यासाठी लागण्याऱ्या नवीन पध्दतीच्या पायऱ्या या वर्गात सांगण्यात आल्या. अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे धडे या उद्बोधन वर्गात देण्यात आले.
या वर्गात NAS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रश्नांची निर्मिती कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक शनिवारी NAS च्या धरतीवर प्रत्येक शाळेत पेपर घेऊन सराव द्यावा असे सांगण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ डायटचे अधिव्याख्याता बजरंग बोडके, पुंडलिक येरावार विषय सहाय्यक, दिकोंडावार सर केंद्रप्रमुख प्रमुख सुलभक म्हणून काम पाहिले. यावेळी जि.प शाळा मुकूटबन येथील मुख्यध्यापक गजानन कुर्रेवार, माधव उदार व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जगदीश आरमुरवार यांनी सहकार्य केले.