उमरी खुर्द येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव

हजारो भाविक झाले उत्सवात सहभागी

0

मानोरा: तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे संत जेतालाल महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. स्थानिक जेतालाल महाराज मंदिर परिसरात रात्री 12 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी संत सेवालाल महाराज व संत जेतालाल महाराज यांना भोग लावण्यात आला व आडदास झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवारी दुपारी चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

उमरीखुर्द येथे दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यानिमित्त भोगभंडारा,महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री आडदास करून मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात संत जेतालाल महाराज जन्म साजरा केला जातो.

जन्माष्टमीच्या दिवशीच संत जेतालाल महाराज यांची जयंती असते. त्यामुळे बंजारा समाजात हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात एकत्र साजरा केले जाते अशी माहिती डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी दिली. याप्रसंगी महंत यशवंत महाराज, पंजाब महाराज, गोकुळ महाराज व डॉ. श्याम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.