जोतिबा पोटे, मारेगाव : नेहमी प्रमाणेच शुक्रवारी आकाशात ढग दाटले होते. पाऊस येईल असे कोणालाही वाटले नाही; परंतु उत्तरेकडून काळेकुट्ट ढग दाटून आलेत. दुपारच्या सुमारास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन थोडेसे विस्कळीत झाले. जुन्याकाळी असाच पावसात पोळा भरला की, त्याला घोंगळी पोळा भरला असे जुने लोकं सांगतात. आज अनेक वर्षानंतर पावसात पोळा भरल्याने त्या दिवसाची आठवण झाली, असे एक वृद्ध ग्रामस्थ म्हणाले. परंतु त्यावेळेस घोंगळी असायची. आता पोळ्यात छत्री असल्याने हा पोळा लोकांनी पावसात छत्री घेऊन साजरा केला.
शहरात ऐन पोळा भरण्याच्या वेळेस पावसाची जोरदार हजेरी व ढगाच्या गडगडाटात सुरु झाला. जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसात छत्री घेऊन पोळा साजरा केला .परंतु रिमझिम पाऊस असल्याने बैल पोळा पाहणाऱ्यांच्या उत्साहावर असा विशेष परिणाम झाला नाही. काही जणांचा हिरमोड झाला, एवढं मात्र नक्की.
तालुक्यात बैल पोळा हा सण शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. पोळा असल्याने शहरात लहान मुलांसाठी फुगे, नंदी तथा खेळणी विकणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने लावली होती. परंतु चार वाजताच्या झालेल्या जोरदार पावसाने दुकाने आवरती घ्यावी लागली. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेकजन पोळ्यात आलेच नाही हे विशेष.
.