नागेश रायपुरे, मारेगाव : स्व. केशवराव महादेवराव कातकडे बहुद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव आणि स्वर्गीय महादेवराव कातकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना रुग्णसेवाद्वारा आयोजित नेत्रतपासणी, मोफत चष्मे, औषधीवाटप शिबीर तालुक्यातील मार्डी येथील हनुमान मंदिर देवस्थान मध्ये झाले. असून या शिबिराचा लाभ परिसरातील हजारो रुग्णांनी घेतला.
इंदीरा सूत गिरणी वणीचे अध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे वणी विधान सभा क्षेत्राचे संघटक समाजसेवक सुनील कातकडे यांच्या नेतृत्वात् हे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराचा लाभ मार्डी परिसरातील हजारो रुग्णांनी घेतला. रुग्णांची तपासणी करुन मोफत चष्मे आणि औषधी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेनेचे उपजिल्हाप्रमुख सजंय निखाडे होते. उद्घाटक सरपंच रविराज चंदनखेडे होते. तर प्रमुख अतिथी दीपक कोकास, विनोद मोहितकर, वसंतराव मोहितकर, गजानन किन्हेकर, डॉ. विलास बोबडे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.बोबडे यांनी केले तर संचालन माणिक कांबळे यांनी केले
या शिबिराला अलोणे आय क्लिनिक अँड सर्जिकल केअर सेंटर,वणीचे डॉ.अनिकेत अलोणे, डॉ.समीर वैद्य, डॉ.अमोल पंडित, डॉ.सुनील ढोले, डॉ.अनिल देशकर, डॉ.महमुद खाँन, ड़ॉ.आशना रोकड़वार यांनी सहकार्य केले. तर माणिक कांबळे, राजकुमार बोबडे, प्रफुल झाडे, सुरेश चांगले, विजय मेश्राम, विशाल किन्हेकर, सचिन पचारे यांनी परिश्रम घेतले.