विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकतानगर परिसरात एका चिकनच्या दुकानात मंगळवारी 4 वाजताच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चिकन दुकानाशिवाय, इस्त्रीचं दुकान, खानावळ व झुणका भाकर दुकान जळून खाक झाले. पोलिसांना घटना समजताच त्यांनी घटनास्थळी पोहचून अग्निशामक दलाल पाचारण केले. त्यामुळे मोठा विद्ध्वंस टाळला.सर्व व्यावसायिक फुटपाथवर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे, मंगळवारी शब्बीर शेख यांच्या चिकनच्या दुकानात चांगलीच ग्राहकांची गर्दी होती. त्यामुळे त्यांनी गॅसवर लवकर काम होईल म्हणून रॉकेल स्टोव्ह बंद करून गॅस लावला. कदाचित गॅस लीक असल्याने पेट घेणे सुरू झाले. लवकरच वरील टिनाच्या शेडला आग लागली. त्यानंतर विजेच्या ताराला आगा लागली. जवळच असलेल्या एका दुकानदाराच्या लक्षात ही बाब येताच त्याने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या व्यावसायिकांनी आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पळ काढला. पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी पोहचून अग्निशामक दलाला माहिती दिली.
अग्निशामक दल पोहचेपर्यंत या ठिकाणावरील शमा निजाम यांचे खानावळ, मालाबाई ताजने यांचे झुणका भाकर केंद्र, रुक्षी पेंदोर यांचे कपडे प्रेसचे दुकान जाळून खाक झाले. परिस्थिती लवकर आटोक्यात आणल्याने मोठा नुकसान टळले. कारण या दुकानांना लागून अजून दुकाने होती.
या आगीत गरीब व लहान व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण भार त्या व्यवसायावर असल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे. इतकेच महत्वाचे की, या आगीत कुणालाही इजा झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.