गुढीपाडवा उत्सवावर कोरोनाचे सावट

व्यापारी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या अनेक वर्षापासून शेतीपाठोपाठ आता व्यापार , व्यवसाय क्षेत्रालाही मंदीचे ग्रहण लागले आहे. त्यात आता कोरोनाच्या साडेसातीची भर पडली असल्यामुळे नजीकच्या काळात होणाया मराठी नववर्षाच्या गुढी पाडवा या सणावर कोरानाची छाया पडणार असल्यामुळे याचा परिणाम इतर अनेक उद्योगांवर जाणवणार आहे. 25 मार्च रोजी असणाया गुढी पाडव्याच्या सणानिमित्त घरोघरी गोडधोड करण्याची परंपरा आहे. हा सण अगदी गरिबातल्या गरीब कुटुंबांमध्ये केला जातो. यंदा कोरोनामुळे गुढी पाडवा सण साजरा करताना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

गुडी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात आर्थक उलाढाल यादिवशी होत असते. किराणा व्यवसाय, कपडे व्यवसाय, वाहन खरेदी, सोने खरेदी यासह इतर अनेक वस्तूंची खरेदी करण्याची एक प्रथा ग्रामीण भागासह शहरी भागात आहे. उत्साह आणि आनंदाच्या या क्षणावर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. आता व्यवसाय, उद्योगांना आणखीनच याचा फटका सहन करावा लागणार आहे. शासनाच्या आदेशावरून तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना जाण्याचे टाळले असल्याचे सध्या दिसून येत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणा_या वस्तंची खरेदी करण्यासाठी तुरळक प्रमाणात लोक शहरात येत आहेत.

याचा परिणाम गुढी पाडव्यानिमित्ताने होणा-या आर्थक उलाढालीवर होणार आहे. कोरोनाची भीती सर्वत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या विषाणूजन्य रोगावर मात करण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांनीच प्रशासन व शासनास सहकार्य करून सतर्कता बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. सोशल मीडियावर कोरोनाविषयीचे अनेक संदेश फिरताना दिसत आहे. अनेक संदेश फिरताना दिसत आहे. यामध्ये अनेक संदेश नागरिकांना सतर्क व नागरिकांच्या हिताचे आहेत. काही संदेशांतून विनाकारण कोरोनाबाबतीत पराचा कावळा केला जात आहे. तरीही नागरिकांच्या सहकार्याशिवाय या विषाणूजन्य रोगाला प्रतिबंध घालणे शक्य नाही.

अफवापासून सावध राहण्याचे आवाहन
कोरोना रोगाची चर्चा आता तालुक्यात जोर धरत आहे. वेगवेगळ्या अफवा सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. या अफवा अज्ञानातून लोकांच्या माध्यमातून आणखीनच सुसाट वेगाने पसरत आहेत. या विषाणूजन्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लागरिकांना किमान गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल पाहिजे. या रोगासंबंधीची जी लक्षण आहेत त्याबाबत तात्काळ सतर्क होऊन वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे प्रशासनावर वाढत असलेला ताप लक्षात घेता जर नागरिकांनीच सहकार्य केले, तर जगाला वेठीस धरणा-या कोरोनाला अटकाव करणे सहजच शक्य होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.