जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद, रस्त्यावर शुकशुकाट

ग्रामीण भागातही कडकडीत बंंद, बसस्थानक ओसाड

0

टीम वणी बहुगुणी: कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला वणी उपविभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. वणी शहरात ‘जनता कर्फ्यू’मुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. बंदमुळे लोकांनी घरातच राहणं पसंत केले आहे. बसस्थानक व ऍटो, ट्रॅव्हस्ल पॉइंटवरही शुकशुकाट दिसून आला. हिच परिस्थिती मारेगाव, मुकुटबन या ठिकाणीही आहे. झरी तालुक्यात खातेरा, पाटण, ल पांढरकवडा, शिंदीवाढोना, झरी, शिबला, माथार्जुन, अडेगाव या गावात सुद्धा लोक उत्स्फुर्तपणे या बंद मध्ये सहभागी झाले आहेत. वणी तालुक्यातील शिरपूर येथेही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

फक्त पेट्रोलपंप आणि मेडिकल, सुरू
सध्या जनता कर्फ्यू मुळे पेट्रोलपंप, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे.  काही मेडिकल स्टोअर सुरू आहे. पेट्रोलपंप जरी सुरू असले तरी कुणीही घराबाहेर पडत नसल्याने पेट्रोलपंपावरही शुकशुकाट दिसून येत आहे. बस सेवा बंद असल्याने बसस्थानकात स्मशान शांतता आहे. ट्रॅव्हल्स व ऑटोपॉइंट देखील बंद असल्याने हा परिसरही सामसूम आहे. घरी कंटाळा आल्याने एक दोघांचा अपवाद वगळता वणी व परिसरात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जातोय.

खर्र्याची लपून विक्री
दरम्यान कडकडीत बंद असला तरी खर्रा शौकिनांनी मात्र खर्र्याला या बंदमधून उत्स्फुर्तपणे बाहेर ठेवले आहे. मार्केटमधल्या पानटपरी बंद असल्या तरी आतील भागातीस गल्लीत तसेच काही आतील पानटपरीबाहेर खर्याची लपून विक्री सुरू आहे. मात्र लॉकडाऊननंतरच्या इतर दिवसांपेक्षा ही विक्री कमी असल्याचे दिसून येत आहे. बंददरम्यान पोलिसांचे दोन वाहन पेट्रोलिंगसाठी फिरत आहे.

पाटण येथे उत्स्फुर्त प्रतिसाद
शिरपूर येथे असा शुकशुकाट दिसून आला
Leave A Reply

Your email address will not be published.