वणी निर्जंतुकीकरणास सुरूवात, शहरात फवारणी

फॉगिंग आणि फवारणी मशिनद्वारा प्रभाग होणार निर्जंतूक

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक ती पावलं उचलली आहे. आज दिनांक 23 मार्च सोमवारी वणीतील मुख्य रस्त्यांवर फायरब्रिगेडद्वारा सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. आज वणीतील टीळक चौक परिसरातून फवारणीला सुरूवात करण्यात आली असून ही फवारणी यवतमाळ रोड येथील रेल्वे फाटक पर्यंत. साईमंदीर ते नांदेपेरा रोड रेल्वे फाटक, टिळक चौक ते वरोरा रोड रेल्वे फाटक, खाती चौक ते जत्रा मैदान अशा शहरातील मुख्य रोडवर करण्यात येणार आहे.

मुख्य रस्त्यावरील फवारणी झाल्यानंतर शहरातील ज्या भागात फायरब्रिगेडची गाडी जाऊ शकते त्या संपूर्ण भागात जाऊन फवारणी केली जाणार आहे. त्यासोबतच स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रभागात फॉग मशिनचा वापर केला जात आहे. नगर पालिकेकडे असलेल्या नादुरुस्त असलेल्या फॉग मशिन दुरुस्त करण्यात आल्या असून एकूण पाच मशिनचा वापर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येत आहे.

उद्यापासून प्रभागासाठी 2 नवीन फवारणी मशिन: नगराध्यक्ष
सध्या वणीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारी म्हणून नगरपालिकेने योग्य ती उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. सध्या फायरब्रिगेडच्या गाडीद्वारा फवारणी सुरू आहे. मात्र गल्लीमध्ये तसेच आतील भागात गाडी जाणे शक्य नसते. त्यासाठी नवीन फवारणी दोन मशिन बोलवण्यात आली आहे. आज संध्याकाळ पर्यंत (सोमवारी) ही मशिन वणीत येणार असून उद्यापासून सोडीयम हायड्रोक्लोराईडच्या फवारणीचे काम सुरू आहे. एका दिवसात तीन प्रभाग निर्जंतुकीकरणाचे ध्येय आहे. – नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे

अशा दोन फवारणी मशिन होणार वणीत दाखल

वणीमध्ये परदेशातून आलेल्या व देशांतर्गत प्रवास करून आलेल्या व्यक्तींना काही दिवसांसाठी ‘होम कॉरेन्टाईन’ करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच आता वणी शहर निर्जंतुकीरणाला सुरूवात झाली आहे. वणीमध्ये एकही रुग्ण नसले तरी लोकांनी घोळक्याने एकत्र येऊ नये तसेच सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये असे आवाहनही नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.