मुकुटबनमध्ये दारूचे दुकान उघडताच मदयपींची खरेदीकरिता मोठी रांग
दारूची शिशी मिळताच हिरमुसल्या चेहऱ्यावर तेज
सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने देशी विदेशी संपुर्ण दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दीड महिना बंद नंतर ११ मे रोज देशी दारू व वाईनशॉपीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडून विकण्याची परवानगी देण्यात आली. मुकूटबन येथील देशी दारूचे दुकान सकाळी उघडताच मदयपींची मोठी रांग पहायला मिळाली. दारू विकत घेण्याकरिता मुकूटबनसह अडेगाव, खडकी, गणेशपूर, कोसारा, तेजापूर येथील मद्पींनी एकच गर्दी केली होती.
रविवारी दारूचे दुकान उघडणार असल्याची माहिती रात्रीच हवेसारखी परिसरातील गाव खेड्यात पोहोचली होती. त्यामुळे मद्यशौकिनांनी सकाळपासूनच दारूच्या भट्टीवर एकच गर्दी केली होती. मदयपींची रांग पाहून ठाणेदार धर्मा सोनुने आपल्या कर्मचारी पुरूषोत्तम घोडाम नीरज पातूरकर, जितू पानघाटे, राम गडदे होमगार्ड प्रजोत ताडूरवार व इतर कर्मचारी पोहचून सोशल डिस्टसिंग चे पालन करून रांगेत उभे राहण्यास बाध्य केले,
दारू दुकान मालकाकडूनही स्वतःचे कार्मचारी व खासगी माणसे लावून शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास सांगत असल्याचे पहावयास मिळाले. दारू खरेदी करिता येणाऱ्याना सैनिटायझरने हात साफ करूनच दुकानात दारूच्या खरेदी करीत प्रवेश होते. मद्य विक्रीमुळे शासनाला महसुल रूपात मोठी आवक होत असल्याने दारूची दुकाने उघडण्यात आल्याचे बोलले जात आहे.