टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड-पुनवट रत्यावर अपघात

रत्यावर साचला टरबुजांचा सडा....

0
विलास ताजने, वणी: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून विदर्भातील चंद्रपूर येथे विक्रीसाठी टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड ते पुनवट दरम्यान दि. 20 बुधवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेड येथील शेतकरी टरबूज विक्री साठी ट्रक क्रमांक (एम. एच. 26 एडी 1892) नी वणी मार्गे चंद्रपूर येथे जात होते. पूरड ते पुनवट रस्त्यावरील प्रवासादरम्यान ट्रकचा टायर फुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुभाजकावर पडला. यावेळी ट्रक मधील टरबूज रस्त्यावर विखुरले. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्यांचे अंदाजे 75 ते 80 हजारांचे नुकसान झाले आहेत.
टाळेबंदीमुळे बंद असलेली फळांची विक्री सुरू झाली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी टरबूज, काकडी आदी मालाची विक्री करण्यासाठी वणी, चंद्रपूर येथे  नेहमी ट्रकद्वारे ये जा करतात. मात्र अचानक घडलेल्या या अपघातामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.