गोकुळनगरमध्ये जुगार अड्यावर धाड

6 आरोपींना अटक, 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे पोलिसांनी आज मंगळवारी दुपारी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 34500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.

गोकुळनगर येथे छुप्या रितीने जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली. येथून किशोर सखाराम भराडे (38), विजय मारोती वाघडकर (25), अनिल अजाबराव झरेकर (23), किशोर ठमाजी भगाडे (32), संदीप भगत पोटे (29) व दिनेश भगत पोटे (19) हे जुगार खेळताना आढळले.

पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. त्यांच्याकडून 24 हजार 500 नगदी व एक मोबाईल असा एकूण 34 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर कलम 269 व महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम 12 (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, दीपक वाड्रसवार, सुदर्शन वनोळे व प्रशांत आडे यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.