मनसेचे ग्रामीण रूग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण
मारेगावात एक वर्षांपासून डॉक्टरांचा अभाव
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका वर्षांपासून ग्रामीण रुग्नालयात डॉक्टरांच्या अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. याविरोधात मनसेनं शासन दरबारी वेळोवेळी निवेदनं सादर केले. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे अखेर मनसेने उपोषणाचं हत्यार उपसलंय. 16 ऑगस्ट बुधवारपासून दुपारी 12 वाजेपासून मनसेनं आमरण उपोषण सुरू केलं आहे.
स्थानिक जिजाऊ चौकात मनसेनं उपोषणाचा मंडप उभारून मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सांबजवार हे त्यांच्या सहकार्यांसोबत आमरण उपोषणाला बसले. येथील ग्रामीण रुग्णालयात जो पर्यंत वैद्यकीय अधिक्षक व डॉक्टराची पदे भरल्या जात नाही, तो पर्यंत उपोषण सुरू राहिल अशी माहिती त्यांनी वणी बहुगुणीला दिली.
(राजुरच्या वेकोली कॉलनीत शिरले नालीचे पाणी)
सांबजवार याच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, कार्यकर्ते रमेश सोनुले, रुपेश ढोके आणि सहकारी उपोषणाला बसले आहे.