विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आवडीच्या सणावर दुष्काळाची सावली पसरल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. परंतु त्यांचा हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पावसाअभावी जलाशय कोरडी पडली आहे. जमिनीला भेगा पडल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहे.
पोटच्या पोरांसारखी जपलेली पिके सुकलेली पाहून शेतकऱ्यांचा आनंद चिंतेत बदलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वणी तालुक्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पोळा सणाचे आगमन होत आहे. सणासाठी बैलाच्या साजाणी बाजारपेठा सजल्या आहे. मात्र शेतकऱ्यांकडे खरेदीसाठी पैसा नसल्याने दुकानाकडे पाठ फिरवली आहे.
(हे पण वाचा: कृषिप्रधान देशात पोळ्याच्या सुट्टी पासून विद्यार्थी वंचित )
उत्साहात साजरा होणारा सण काटकसरीने साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चिमुकल्याच्या तान्ह्या पोळ्यावर सुद्धा दुष्काळी परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे.