ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पेरणी झालेले खरिप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पाऊस नसल्यानं सुकू लागले होते. पण शनिवारी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यानं बळीराजा सुखावला आहे. शनिवारी 35 मीली इतक्या पावसाची नोंद घेण्यात आली.
तालुक्यात एकून पंचेचाळीस हेक्टर जमीन लागवडी खाली आहे. त्यात 25 हजार हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली असून उर्वरित 9 हजार हेक्टरवर सोयाबीन, तर साडेसात हजार हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. या पावसामुळे या सर्व पिकांना चांगला फायदा होणार आहे.
तालुक्यात आजपर्यंत एकून सरासरी पाऊस 320 मीली पडला. अत्यल्प पावसामुळे चालू खरीप हंगामातील उत्पन्न कमी होणार असल्याचा अंदाज शेतकरीवर्ग वर्तवित आहे. येणा-या संकटाला तालुक्यातील शेतकरी कसा तोंड देनार, शेतकऱ्याच्या या संकटाकडे शासन कसे लक्ष देणार, असे अनेक प्रश्न असले तरी तालुक्यातील शेतीचा सर्वेक्षण शासनाने करुन कमी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई शासनानं करावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
(हे पण वाचा: झरी तालुक्यात दमदार पाऊस)
गेल्या वर्षभरात मारेगाव तालुक्यात पंचवीसच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद प्रशासन दरबारी असताना तालुक्यात राबवलेले ‘बळीराजा चेतना अभियान’ कुचकामी ठरले आहे. तसेच या वर्षी अत्यल्प पावसाने तालुक्यातील मध्यम प्रकल्पाचे नवरगाव धरण आजच्या घडीला तळ गाठून आहे. त्यात फक्त पाण्याचा मृत साठाच शिल्लक आहे. त्यामुळे येणा-या रब्बी हंगामात धरणाचे पाणी मिळन्याची शाश्वती नाही. परिणामी आर्थिक संकट गडद होणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे यावर शासनानेच उपाय करुन तालुक्यातील शेतक-यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.