खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार
ऑनलाइन फार्मसाठी मोजावे लागतात पैसे, शेतक-यांचा आरोप
ज्योतिबा पोटे, मारेगाव: सरकारनं शेतक-यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकल्याने शेतकरी वर्ग गोंधळात पडला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शासनाच्या अस्पष्ट धोरणानं संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळन्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागत आहे.
मारेगाव तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं संबंधित विभागानं सांगितलं असल, तरी अनेक ठिकाणी नेटच्या प्रॉब्लेममुळे ऑनलाईन प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. त्यामुळे ऑनलाईन केंद्रावर अफाट गर्दी होत आहे. दरम्यान काही शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी केंद्र धारक पैसे घेत असून त्याची कोणतीच पावती देत नाही नसल्याचा आरोप केला आहे.
(मारेगाव तालुक्यात दमदार पाऊस, शेतकरी सुखावला)
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी अनेक शेतकरी संघटना शासनाच्या विरोधात मोर्चे, आंदोलने करीत आहे. मात्र शासन त्याची कोणतीही दखल घेत नसताना दिसत आहे. शेतक-यांची आर्थीक लूट शासनातील शेतकरी पुत्र डोळे उघडे करुन पाहत आहे. शेतक-यांवर होनारा अन्याय कधी दुर होणार हे एक कोडेच आहे.