हंसराज अहिर व आ. बोदकुरवार यांची RCCPL कंपनीला भेट

● कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर भेट, कामगारांची केली विचारपूस

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीत मुकुटबन व परिसरातील तसेच बाहेर राज्यातील सुमारे १७०० ते १८०० कामगार काम करतात. या कंपनीत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली.

या भेटीत त्यांनी कंपनीची व सील केलेल्या भागाची पाहणी केली. इतर कामगार, कर्मचारी व ग्रामवासीयांना धोका निर्माण होऊ नये याकरिता कंपनीचे हेड दत्ता व व्यास यांना सूचना दिल्या तसेच इतरही समस्या जाणून घेतल्या. दरम्यान पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच शंकर लाकडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष चक्रधर तिर्थगिरीकर सामाजिक कार्यकर्ते अशोकरेड्डी बोदकुरवार, दत्तू चिंतावार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.