सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे: किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने ‘शेतकरीविरोधी कायदे’ या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं 5 ते 6.30 या वेळात होईल. ‘चपराक’चे संपादक घन:श्याम पाटील हे शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
या शिबिरात डॉ. विकास सुकाळे (नांदेड) हे सिलिंग कायदा, ऍड भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार उगले (नाशिक) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनांदुरुस्त्या बद्दल ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच संदीप रोडे (अमरावती) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन या वर बोलतील. समारोप सत्रात सर्जकांचे स्वातंत्र्य या विषयावर अमर हबीब मार्गदर्शन करणार आहेत.
मयूर बागुल हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद करणार आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातुन शिबिरार्थींना भाग घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9096210669 या क्रमांकावर संपर्क साधावा. https://forms.gle/s66BW8JjMNyWWGmJ6 ही नोंदणी अर्जाची लिंक आहे.