कोरोनाचा सलग दुसरा सिक्सर… आणखी 6 रुग्णांची भर

कोरोनाची फिफ्टी पूर्ण... रुग्णांची संख्या 53

0

अपडेटेड न्यूज….

चिंचोली गावात कोरोनाचे 2 रुग्ण, ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात मंगळवारी 6 रुग्ण आढळून आल्यानंतर आज कोरोनाचे आणखी 6 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 5 रुग्ण तेली फैलातील व 1 रुग्ण रजा नगर येथील आहे. यात 2 महिला व 4 पुरुष आहेत. रजा नगर येथे आढळलेला रुग्ण ही नवीन साखळी आहे. आज नवीन 6 रुग्ण आढळल्याने कोरोनाने फिफ्टी क्रॉस केली असून रुग्णांची एकूण संख्या 53 झाली आहे.

मंगळवारी घोन्सा येथे कोरोनाचे अचानक 4 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याशिवाय 1 तेलीफैल व 1 गणेशपूर येथे रुग्ण आढळून आला होता. काल तालुक्यात एकही रुग्ण आढळून न आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र आज अचानक आणखी 6 रुग्ण आढळून आले. यातील तेली फैलातील 5 रुग्ण असल्याने तेली फैलात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होताना दिसत आहे.

यंग ब्रिगेडमध्ये कोरोना प्रसार
आज जे 6 रुग्ण आढळून आले आहेत हे 6 ही रुग्ण तरुण आहेत. यातील 5 रुग्ण हे तेली फैलातीलच असून एक रुग्ण हा पॉव्हर हाऊस रोडस्थीत रजा नगर येथील आहे. हा रुग्ण बिहार येथून वणीत आला होता. बाहेरून आल्यामुळे त्याची टेस्ट केली असता तो रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आला आहे. आज निष्पन्न झालेले सर्व रुग्ण हे 18 ते 24 वयोगटातील असल्याने तरुणाई तर कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही बातमी अपडेट झाली आहे. अपडेटेड न्यूज खाली….

चिंचोली गावात कोरोनाचे 2 रुग्ण, ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा

Leave A Reply

Your email address will not be published.