दारूची तस्करी करताना एकाला अटक

सव्वाचार लाखांची देशी दारू जप्त, चिखलगाव येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शहराच्या नजीक असलेल्या चिखलगाव येथून गुरुवारी रात्री 10 वाजतच्या सुमारास सव्वा चार लाखांच्या देशी दारुसह 9 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एका आरोपीस अटक करून त्याच्यावर विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई डीबी पथकाने केली.

गणेशोत्सव व मोहरम निमित्त पेट्रोलिंग करीत असताना गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिसांना चिखलगाव येथील बोधेनगर येथे देशी दारूने भरलेले पिकअप वाहन उभे असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सदर माहिती वरिष्ठांना देत डीबी पथक घटनास्थळाकडे रवाना झाले.

सदर ठिकाणी पीकउप वाहन उभे होते. त्यात राजू शंकर आत्राम (22) रा. गोकुलनगर वणी हा व्यक्ती बसून होता. पोलिसांनी जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू 180 मीली क्षमतेचे 77 बॉक्स किंमत 1 लाख 92 हजार 500 तर 90 मीलीचे 88 बॉक्स किंमत 2 लाख 28 हजार 800 आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करत आरोपीला अटक केली. व या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पीकउप वाहन (MH49 D7064) किंमत 5 लाख रुपये जप्त करण्यात आले.

राजू आत्राम याच्यावर कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कलम 269, 188 व भादवी कलम 65 (इ), 82, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे.

खरा सूत्रधार वेगळाच?
अटक करण्यात आलेला आरोपीजवळ इतक्या मोठया प्रमाणात दारूचा माल आला कसा? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच राजू आत्राम केवळ प्यादा असून खरा सूत्रधार वेगळाच आहे अशा चर्चेलाही सध्या चांगलेच उधाण आले आहे. अनेक प्रकरणात मूळ सूत्रधांरांना सोडून नोकरावर कारवाई केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.