जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 30 ऑगस्ट रविवार रोजी वणीत कोरोनाचे 16 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार तर 14 रुग्ण आरटी-पीसीआर (स्वॅब) नुसार आले आहेत. आजच्या आकड्यामुळे कोरोनाचे तालुक्यातील एकूण रुग्ण 175 झाले आहेत.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये पद्मावती नगर येथे 1, लालगुडा येथे 1, वसंत विहार येथे 2 काकडे ले आऊट (गणेशपूर) येथे 4, राजूर येथे 1 तर भालर येथे 7 रुग्ण आढळून आले आहेत. आज लालगुडा येथे कोरोनाने एन्ट्री केली आहे.
शहरात दिवसेंदिवस वाढणा-या रुग्णांने शहरात दहशत निर्माण झाली आहे. रोज एक आकडी आढळणा-या कोरोना रुग्णांची संख्या आता रोज दोन आकडी झाली आहे. आधी शहरी भागात राहणा-या कोरोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात सततची वाढणारी रुग्णसंख्येने ग्रामीण भागातील रहिवाशांची चांगलीच चिंता वाढवली आहे.
वणीकर झाले बेसावध?
रोज कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक मात्र निश्चिंत आहेत. सुरवातीच्या काळात जी खबरदारी नागरिकांनी घेतली त्याकडे आता ते दुर्लक्ष करताना दिसत आहे. मास्क न वापरणे, एकत्र येणे, गप्पांचे फड रंगवणे, कार्यक्रमानिमित्त एकत्र येणे. कन्टेन्मेन्ट झोनच्या बाहेर निघणे असे प्रकार समोर येत असल्याने कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.