परसोडा कोवीड 19 सेन्टरवर रुग्णांची गैरसोय..

रुग्ण त्रस्त, तातडीने उपाय करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी...

0

विवेक तोटेवार, वणी: परसोडा येथील कोवीड- 19 सेंटरवर असलेल्या रुग्णांना घाण, कचरा आणि दुर्गंधीत राहावे लागत आहे. त्यामुळे नवीच समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना आपला वेळ कसा काढावा व केंद्रात कसे रहावे असा प्रश्‍न निमाण झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वणी शहर महिला अध्यक्ष सविता टेपाले यांनी केंद्रावरील समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा सोमवारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आरोग्यमंत्री टोपे साहेब यांना दिला आहे.

देशात आज कोविड- 19 ने थैमान घातले आहे. जिकडे-तिकडे सर्वसाधारण माणसाचा जीव वावविण्यासाठी
शासनाची अतोनात प्रयत्न सुरु आहेत. ठिकठिकाणी कोरोनासेंटर उभारुन शासनाचा लाखोचा निथी सर्वसाधारण
माणसांच्या उपचाराकारितां आणि सेवा मिळविण्याकरिता खर्च होतोय. शासनाची घडपड सुरुच आहे.

वणीच्या परसोडा कोवीड 19 सेंटरवर असलेल्या बेडवर गाद्या उपलब्ध नाहीत. ज्या गाद्या आहेत त्या स्वच्छ नाहीत. गाद्यांवर चादरी नाहीत. आहेत त्याही घाणीच्या व दुर्गंधी आहेत. केंद्रावर साफसफाई करणारे कुणी आहेत किंवा नाहीत हे केंद्रावरील परिस्थिती बघितल्यावर प्रश्‍न पडतो. सेटरच्या भिंती पान -खर्ऱ्याने माखल्या आहेत.

वेळोवेळी फरशी पुसणारे दिसून येत नाहीत. सेंटरवरील अधिकारीसुद्धा सेंटरवरील साफसफाईवर लक्ष देताना दिसून येत नाहीत. अशात रुग्णांना आपले आरोग्य धोक्यात असल्याची जाण होत आहे. शासनाकडून देशात असलेल्या अशा केंद्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाते; परंतू हा खर्च म्हणजे शासनाच्या रकमेचा दुरुपयोग तर होत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ सर्वसाधारण रुग्णांना मिळत नसल्याने शासनाची कुठेतरी फसवणूक होत असल्याने आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना उपविभागोय आधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले. यावर प्रशासनाने लक्ष देऊन समस्या सोडविली नाही तर राष्ट्रवादी पक्ष व वणी शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जयसिंगराव गोहोकार, राजाभाऊ विलोरिया, विजया आगबत्तलवार, सविता
देपाले, वैशाली तावडे, मंदा दानव. वर्षा बाेंडे, शोभा विरुडवार, बबिता पिंपळशेंडे, निर्मला मगरे, रामकृष्ण वैद्य, इत्यादी पदाधिकारी, कार्तकर्ते आणि कार्यकर्त्या उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.