मारेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर, पुन्हा 7 पॉझिटीव्ह
पंचायत समिती नंतर तहसील कार्यालयात शिरकाव
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात टाकळी येथील 4, रोहपट 2, करणवाडी 1 असे तीन महिला व चार पुरुष एकूण 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. कोरोनाने मारेगाव येथील पंचायत समिती नंतर आता तहसील कार्यालयातसुध्दा शिरकाव केला आहे.
पूर्वी कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात आता यवतमाळ, वणी, पांढरकवडा नंतर मारेगाव तालुक्यातसुध्दा कोरोनाने पाय पसरल्याने नागरिकांत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात रोहपट या खेडेगावात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाधित एका दुकानदाराचा मृत्यूने मोठी दहशत निर्माण झाली. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 33 वर पोहचला आहे.
मारेगाव तालुक्यात व्यापाऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयानंतर आता तहसील कार्यालयातसुद्धा कोरोनाने एन्ट्री केली आहे. तहसील कार्यालयातील एक अधिकारी पॉझेटिव्ह आढळल्याने महसूल प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)