विधवेवर अत्याचार, आरोपीला ठोकल्या बेड्या

नरसाळा येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आजच्या आधुनिक काळातही समाजात विधवा सुरक्षीत नाही. तिला आजही लाळ गाळणा-या श्वापदांचा त्रास सहण करावा लागतो. काही रंगेल लोकांच्या नजरा तर अशा असहाय असणा-यांना कायमच हेरत असतात. विधवा म्हणजे संधी अशी ही काही लिंगपिसाटांची धारणा असते. मात्र जेव्हा मनात विकृती घर करते. तेव्हा गुन्हा घडत असतो. मारेगाव तालुक्यातील नरसाळ्यातही एक अशीच घटना घडली. एका विधवेवर अत्याचाराची. संधी साधून आरोपीने महिलेने डाव साधला. मात्र गुन्हा लपत नसतो. पोलिसांनी आरोपीच्या त्याच दिवशी मुसक्या आवळल्या.

मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे पीडिता राहते. तिच्या पतीचे निधन झाले आहे. गावातच अजय शांताराम धुर्वे (28) हा तरुण राहतो. पीडित महिला पहाटे झोपून होती. दरम्यान आरोपीची पीडितेवर नजर होती. आजूबाजून कुणीही नाही याची खात्री करून आरोपी विधवा महिलेच्या घरात घुसला व तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान महिलेने आरडा ओरडा केला असता आरोपी घटना स्थळावरून पसार झाला.

सकाळी महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार केली, ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी आरोपी अजय धुर्वे विरोधात कलम 452,376,606 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल केला. टीम पाठवून ओरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.