सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बाेलले जात आहे.
तेजापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दोन अवैध दारू विक्री वाढला आहे. पोलीसांनी यावर कोणतीच कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथे दारूची चढ्या दराने विक्री होते. दारूविक्रेत्यांमध्ये कदाचित व्यावसायिक स्पर्धादेखील असावी. गोरगरीब जनता व्यसनांच्या नादी लागत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. ही चिंतेची बाब आहे. गावातील प्रतिष्ठित व काही महिला पोलीस स्टेशनवर धडकणार असल्याची माहिती आहे.
हे दारूविक्रेते भरदिवसा स्वतःच्या चारचाकीने मुकुटबन येथून दारूच्या पेट्या खुलेआम पोलीस स्टेशन जवळून नेतात. तरीसुद्धा पोलीस कार्यवाही करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच रात्रीसुद्धा चारचाकी व दुचाकीने तेजापूर येथे अवैध दारूची तस्करी करून दारूचा पुरवठा करीत आहेत.
तेजापूर येथे दारूची तस्करी व दारूविक्री सुरू असताना यवतमाळ एलसीबी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा मारून कार्यवाही का करीत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही अवैध दारू विक्रेते दररोज ८ ते १० पेट्या दारूची विक्री करून लाखो रुपये कमवीत आहेत. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)