नागेश रायपुरे, मारेगाव : पोलिस स्टेशन मारेगाव हद्दीत येत असलेल्या एका महीलेचा येथीलच एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसांत केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.सबळ पुराव्यामुळे सुनावणीत मारेगाव न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची शिक्षा व 3 हजार रुपये दंड ठोठावला. मनोज सूर्यभान पावले (27) रा.मांगरूळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मारेगाव पोलिसांची सतर्कता आणि वेगवान हालचालींमुळे या प्रकरणाला गती मिळाली.
तालुक्यातील मांगरुळ येथील पावले नामक आरोपींने एका महीलेचा घरी कोणीही नसताना विनयभंग केला होता. घटनेची फिर्याद पीडितेने मारेगाव पोलीसात केली होती. ही घटना 26/2/2019 चे रात्री घडली होती. वर्षभर चाललेल्या या खटल्याचा निकाल दोन्हीही बाजुंचे म्हणने ऐकून मारेगाव न्यायालयाने सुनावला. यामध्ये प्रामुख्याने आरोपीकडून 3 हजार रुपये दंड तर एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार, महिला नापोका उमा करलूके यांनी अवघ्या तीन दिवसांत सबळ पुरावे गोळा करून प्रकरण मारेगाव न्यायालयात सादर केले होते.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आरोपींना 3,000 रूपयांचा दंड तर एक वर्षाची शिक्षा सुनावली. प्रकरणात शासनातर्फे अँड. पी. डी. कपूर यांनी तर कोर्टपैरवी म्हणून संगीता डोडेवार यांनी काम पाहिले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)