नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी कपाशी या पिकाची नासधूस केली आहे. यामुळे संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवरील अस्मानी आणि सुलतानी संकटांचं सत्र संपण्याचं नाव घेत नाही आहे.
अवघ्या तालुक्यात वन्यप्राण्यांचा हौदोस वाढला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.बोरी (गदाजी)येथील संभाजी डोमाजी बेंडे यांच्याकडे बोरी शिवारात गट नं 145 शेतजमीन आहे. सोमवारी 21 सप्टेंबर रोजी या शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीच्या जवळपास 200 ते 300 रोपट्यांची रानडुकरांनी नासधूस केली. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई मला मिळावी असे नुकसानग्रस्त हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी केली आहे. परिसरात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. लंपी आजाराने त्यांच्या जनावरांना विळखा घातलेला आहे. निसर्गाचा असमतोला आणि या संकटांनी शेतकरी हतबल झाला आहे. तरी त्याचा लढा सुरूच आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)