नागेश रायपुरे, मारेगाव : आरोग्यविभागाला 23 सप्टेंबर 2020ला अहवाल मिळाला. त्या अहवालानुसार तालुक्यात बुधवारी पुन्हा 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यात मांगरूळ, सगणापूर या दोन गावाचा समावेश आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 17 आहे. मांगरूळ, सगणापूर या गावात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीना ट्रेस करणे व त्यांचे घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू आहे. अलीकडे झालेल्या जनता कर्फ्यूबाबत लोक सकारात्मक आहेत. यातून काही चांगले रिझल्ट्स मिळतील अशी त्यांनी अपेक्षा आहे.
मागील दोन आठवड्यांत तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीयुक्त वातावरण तयार होते, त्यातच मारेगाव येथील एका कोरोनाबाधिताच्या मृत्युने दहशत निर्माण झाली होती. वाढत्या कोरोनाबाधितांची श्रृंखला खंडित करण्यासाठी शहरात 4 दिवसाचा जनता कर्फ्यु करण्यात आला. त्यानंतर बाधितांचे आकडे कमी झाले असावेत, असा सामान्यजनांचा अंदाज आहे.
बुधवारला मांगरूळ येथे 1 अणि सगनापूर येथील 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सध्या अॅक्टीव पॉझिटिव्ह रुग्न १७ झालेत. मागील दोन दिवसांत 47 स्वॅब आरोग्यविभागाने यवतमाळला पाठविलेत. त्यात बुधवारला दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे अहवाल प्राप्त झालेत. नागरीकांनी शासनाच्या गाईडलाईनचे पालन करुन सहकार्य करावे असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगीतले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)