सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या आप्रोहच्या पदाधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांनी केली आहे.
ऑर्गनायझेशन फॉर राईट्सचे संस्थापक तथा अध्यक्ष दादाजी मरसकोल्हे हे व त्यांची संघटना बोगस आदिवासीची पोलखोल करून खऱ्या आदिवासींना न्याय देण्याकरिता संविधानिक न्यायालयीन लढाई लढून बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या सरकारी नोकऱ्या कशा हिरावल्यात ते न्यायालयात सिद्ध करून त्यांच्या विरुद्ध सरकारला कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे.
.
त्यामुळे बोगस आदिवासी चिडलेत व षडयंत्र रचून दादाजी मरसकोल्हे यांना खोट्या तक्रारीत अडकून फौजदारी गुन्हे दाखल केल्याचे म्हटले आहे. खऱ्या आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. बोगस आदिवासींची घुसखोरी यानंतर खपवून घेणार नाही व दादाजी मरसकोल्हे यांच्यावरील बोगस गुन्हे परत घ्यावे ही मागणी होत आहे.
हे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देताना माजी समाजकल्याण सभापती गिरीधर उईके, पोलीस पाटील प्रकाश गेडाम, जागोम दल अध्यक्ष कालिदास अरके, सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी, वासुदेव तोडसाम, श्रावण मडावी, ज्ञानेश्वर आवारी, प्रभाकर कुमरे, नागोराव उरवते, दत्ता परचाके, दयाकर गेडाम, अविनाश कुडमेथे व बंडू सोयाम उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)