ट्रॉमा सेंटरमध्ये कोवीड सेंटर सुरू करा

सेवादल काँग्रेस कमिटीची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये मोफत कोवीड सेंटर सुरू करावे. या मागणीचे निवेदन सेवादल काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री यांना एस.डी.ओंमार्फत दिले. वणीसह परिसरात कोवीडचा उद्रेक वाढत आहे. त्यातही कोरोनाबाधितांची गैरसोय होत आहे. त्याकरिता हे निवेदन दिले.

तालुक्यातही नियमित कोवीड रुग्ण सापडत आहेत. वणी हा यवतमाळ जिल्ह्यातील मोठा तालुका आहे. त्यामुळे शहरात व परिसरात अनेक रुग्ण आहेत. त्यांच्या उपचाराकरिता हे सेंटर लवकरात लवकर सुरू करावे. सध्या वणीतील ट्रामा सेंटर बंद आहे. तिथेच सेंटर उभारल्यास करून रूग्णांवर उपचार करता येतील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे निवेदन शहराध्यक्ष प्रमोद लोणारे, शहर उपाध्यक्ष समीर खॉं काले खॉं, प्रमोद निकुरे, राजाभाऊ पाथ्रडक, भास्कर गोरे, विवेक पानघाटे, विनोद ठमके आणि सलीम खान यांनी दिले. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.