चोरट्यांचा शाळेवरच डल्ला, मारेगाव (कोरंबी) येथील घटना

कॉम्युटरसह इतर साहित्याची चोरी

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील शाळा अज्ञात चोरांनी फोडली. या शाळेतील साहित्य चोरट्याने लंपास केले. सोमवारी ते मंगळवारदरम्यान ही घटना घडली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारेगाव (कोरंबी) येथे जनता विद्यालय आहे. इथे सोमवार ते मंगळवीर रात्री चोरट्याने शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तेथील संगणक, पीसीओ, सिलिंग फॅन इत्यादी असे सुमारे 25 हजारांच्या साहित्यावर डल्ला मारला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरी झाल्याचे लक्षात येताच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तुराणकर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 461 व 380 नुसार गुन्हा दाखळ केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाळ जाधव करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.