नागेश रायपुरे, मारेगाव: केंद्र सरकारने बहुमताच्या ताकदीवर शेतकरीविरोधी बील पास करुन कायदा बनविला. तो शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत शुक्रवारी तालुका कॉंग्रेसने वतीने तहसील कार्यालयासमोर आज गांधी जयंतीच्या पर्वावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
नुकताच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसंदर्भात कायदा बनविला. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला. त्या संदर्भात मारेगाव तालुका काँग्रेस पक्षातर्फे आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार दासरवार याना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात वामनराव कासावार, बाजार समिती सभापती नरेंद ठाकरे, जि.प.सदस्य अरुणा खंडाळकर, जि. प.सदस्य अनिल देरकर, शरीफ अहेमद शफिक अहेमद, मारोती गौरकार, नगरसेवक खालीद पटेल, नंदेश्वर आसुटकर, यादवराव काळे, विलास वासाडे, शंकर मडावी यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्ते उपस्थीत होते
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)