मारेगाव येथे युवकांचा भाजपात प्रवेश

किन्हेकर सभागृहात झाला कार्यक्रम

0

नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय जनता पार्टीमधील वरिष्ठांच्या आदेशाने मारेगाव येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्र्म झाला. भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून तालुक्यातील अनेक युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रविवारी नत्थुजी पाटील किन्हेकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यांमध्ये अनुप महाकुलकर, सचिन देवाळकर, रघुराज बुजाडे, रवी टोंगे, ज्ञांनेश्वर खामनकर, दुष्यंत निकम, सुहास वरारकर, पवन धांडे, अमोल पारखी, शैलेश जुमनाके,अरविंद ढोके, मनोहर गेडाम, शालिक मेश्राम, राजू ढपकसे, राजू जेणेकर, मिलिंद कोल्हे, शंकर कोल्हे यांच्यासोबत तालुक्यातील अनेक युवकांनी भाजपात आपला पक्ष प्रवेश केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाला जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा प्रामुख्याने उपस्थित होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूर्व केंद्रीय मंत्री हंसराजजी अहीर व वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच जिल्ह्याचे महामंत्री रवी बेलूरकर, जिल्हा सचिव शंकर लालसरे होते.

तसेच युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आकाश दुरात, मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, तालुका सरचिटणीस आनंद पचारे, प्रशांत नांदे, पवन ढवस भाजपा शहर अध्यक्ष विलास चिंचुलकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश झाडे, सरचिटणीस रवी दगडे आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.