मारेगाव येथे शिवसेनेची आढावा बैठक

पक्षवाढीसंदर्भात झाली चर्चा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या आदेशानुसार रविवारी आढावा बैठक झाली. पक्षवाढ आणि कोरोना प्रादुर्भावातील पक्षकार्याचा आढावा या संदर्भात जिल्हा शिवसेनाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकरीभवन येथे ही बैठक झाली.

या आढावा बैठकीत कोरोना काळात विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केलेली कामे, पक्षबांधणी संदर्भात चर्चा व विचारविनिमय, पक्षात सदस्य संख्या वाढविण्यासंदर्भात रणनीती, आगामी होणाऱ्या नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुका या दृष्टिने पक्षाची बांधणी व योग्य उमेदवाराची चाचपणी या विषयांवर आढावा घेण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षपदी उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे होते. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा तर महिला उपजिल्हा संघटिका डिमन टोंगे, रवी बोदेकर, युवासेना जिल्हा समन्वयक सतीश वऱ्हाटे, मारेगावच्या नगराध्यक्षा रेखा मडावी, उपसभापती तथा तालुकाप्रमुख संजय आवारी, माजी तालुकाप्रमुख मधुकर वरटकर, माजी तालुका संघटक सुनील गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक शेतकरी मंदिर सभागृहात ही आढावा बैठक झाली. यावेळी मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.