नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील भोंगळ कारभार तत्काळ थांबवा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु. असा इशारा तहसिलदारांमार्फत भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका शाखा मारेगाव यांनी दिला आहे.
भोंगळ कारभारामुळे नेहमीच वादग्रस्त असलेल्या येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शासकीय कार्यालयीन वेळेत येत नाहीत. नेहमी बारा वाजल्यानंतरच यांचे आगमन होत असते. कार्यालयात आलेल्या नागरिकांशी सौजन्याने वागत नाहीत.
कार्यालयात मागील वर्षापासून अनेक प्रकरणे प्रल॔बित आहेत. कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने लांबून येणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक फटका व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या कारभाराला वरिष्ठांनी त्वरीत आळा घालावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल आंदोलन करणार असा इशारा तहसिलदार मारेगाव यांच्यामार्फत जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, यवतमाळ यांना निवेदनामधून दिला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रमेश सोनुले, शहर अध्यक्ष नबी शेख, चांद बहादे, मार्डी विभागीय अध्यक्ष उदय खिरटकर, अजय वासेकर, आदित्य गाडगे, जम्मू सय्यद, प्रणय दिवेकर, सौरभ सोयाम आदी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)